छायाचित्र प्रदर्शनी

वर्ष २०२४-२५ हे भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा केल्या जात आहे.

भारतीय संविधानाच्या  निर्मितीत्या ७५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे देशभरात या निमित्ताने विविध स्तरावर विविध उपक्रम घेण्यात येत आहेत

भोकर पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत घर घर संविधान या उपक्रमांतर्गत गटसाधन केंद्र भोकर या ठिकाणी चार  दिवसीय छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले .

संविधान विषयक विविध चित्रांचे ,संविधान सभेतील विविध कामकाजाचे फोटो, संविधान समेतील सदस्यांच्या मुळ छायाचित्रे ,यांच्या स्वाक्षऱ्या यासंह संविधानाच्या शिल्पकारांचे विविध भाव मुद्रेतील मुळ व दुर्मिळ फोटो,संविधानाच्या मूळ हस्तलिखितप्रतिमध्ये रेखांकीत केलेले भारतीय संस्कृतीचे रेखाचित्रे, डिजाईन्स, अक्षरलेखन , संविधान सभेतील सदस्यांच्या स्वाक्षऱ्या इत्यादी दुर्मिळ व मूळ फोटोंचा समावेश या चित्रप्रदर्शनीत आहे.

छायाचित्र प्रदर्शनीची संकल्पना भोकरच्या गटशिक्षणाधिकारी यांची होती तर विविध चित्रे फोटोंचे संकलन मांडणी, आयोजन व साद‌रीकरण हे भोकरच्या कन्या शाळेचे शिक्षक श्री मिलिंद जाधव यांनी केले .शिक्षिका रुपाली कांबळे (किनी), पंडीत तोटेवाड (देवठाणा), महानाम गायकवाड (थेरबन) आदी शिक्षकांनी या प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली .
 

या प्रदर्शनीचा लाभ शिक्षण विभागातील तालुका  पर्यवेक्षीय यंत्रनेत अधिकारी , तालुक्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारी, पालक यांनी घेतला. छायाचित्रे प्रदर्शनी साठी अनेकांनी शुभेच्छासह उत्तमोत्तम प्रतिक्रीया नोंद‌विल्या.

शब्दांकन
रूपाली कांबळे
( सहशिक्षिका, जि .प .हा .किनी)