संकल्प शिष्यवृत्ती निवासी

येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने, मौजे पाळज येथे पाच दिवसीय "संकल्प शिष्यवृत्ती निवासी सराब अभ्यास वर्ग सूरू करण्यात आले असुन त्याचे उद्घाटन,  जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

         आगामी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संकल्पना अधिक स्पष्ट होऊन त्यांना उत्कृष्ट कार्मागरी करता यावी, यासाठी त्यांची तयारी अधिक प्रभावी आणि परिणामकारक व्हावी या उद्देशाने तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे यांच्या संकल्पनेतून दि.२७ जाने ते ०१ फेब्रु २०२५ या पाच दिवसाच्या कालावधीत मौजे पाळज येथील गणपती मंदीर परिसरात, पाच दिवसीय "संकल्प शिष्यवृत्ती निवासी संराव अभ्यास वर्ग सूरू करण्यात आला आहे.

         मागील सहा महिन्यापासून सातत्याने तालुक्यातील १२४ जिल्हापरिषद शाळेत शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेची जोमाने तयारी करून घेण्यात आली असुन शाळा स्तरावर परीक्षा घेऊन या परीक्षेत गुणानुक्रमे टॉप आलेल्या विद्यार्थ्यांची केंद्र स्तरावर चाचणी घेण्यात आली आणि केंद्र स्तरावर अनुक्रमे टॉप आलेल्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरावर परीक्षा घेण्यात आली. यातील इयत्ता ५वी व ८ची वर्गाच्या च्या एकूण  ५४ गुणवंत विद्यार्थ्यांसाठी हा परीक्षा पूर्व सराव वर्ग सुरू करण्यात आला आहे.  शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमास अनुसरुन अध्यापन, अध्ययन प्रश्नपत्रिका सोडवुन घेणे. पुन्हा त्या त्या विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन, शंका निरसन सत्र आणि योगा असा नित्यक्रम येथे सूरु झाला आहे. या सराव वर्गाच्या पहिल्या दिवशी जिल्हा शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी भेट देऊन अभ्यास वर्गाचे उद्घाटन केले. यावेळीत्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच या उपक्रमाची प्रशंशा करून समाधान व्यक्त केले. श्रीक्षेत्र पाळज गणपती मंदीर ट्रस्टकडून या शिबिरासाठी विशेष मदत केली जात असून  गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे यांच्या मार्गदर्शाखाली शिबिर प्रमुख म्हणून बिस्तार आधिकारी सुमन गोणारकर, प्र. शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मण सुरकार हे काम पहात आहेत. जि प हा पाळज चे मुख्याध्यापक पत्तेवार प्र. शिक्षण विस्तार अधिकारी वी. रा. शिंदे, जकियोद्दिन शेख, नंदेवाड, नरसिंग जिद्देवार, सर्व केंद्रप्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक, कार्यालयीन समग्र कर्मचारी तसेच तज्ञ शिक्षकबांधव, व आराध्या गंगाधर गिरी व समस्त गावकरी या संकल्प संब वर्गाच्या यशस्वितेसाठी कठोर मेहनत घेत आहेत. पालकांकडून यास उदंड प्रतिसाद आहे. 

Image removed.