गौरव गुणवंताचा

विद्यार्थी है दैवत माझे 
हा माझा विश्वास असे 
प्रत्येकाचे रूप मनोहर 
घडविण्यास मी सज्ज असे

दुर्गादास बोर्डे

विद्यार्थी घडविणारे शिक्षक हे समाजासाठी, राष्ट्रासाठी भूषणच ठरतात .विद्यार्थ्यांना घडवत असतांना आपोआपच स्वतः ही घडत असतो .जसे  सुगंध द लावणाऱ्याचे हातही सुगंधीत होतात तसे .

१ मे २०२५ महाराष्ट्र दिनी विद्यार्थ्यांचे  भविष्य घडविणा-या शि क्षकांचे प्रातिनिधीक रूपामध्ये तालुका शिक्षण विभागामार्फत घेण्यात गौरव सोहळा घेव्यात आला . यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शकांचा व शाळेचा समावेश आहे.  शिष्यवृती, नवोदय, एन. एम. एम. एस परीक्षेते विशेष प्राविव्य / संपादणूक मिळविलेल्या तालु‌क्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत गौरव ट्रॉफी (शिक्षक समन्वय सामितीच्या सौजन्याने) व  गुलाबपुष्प देवून गौरविण्यात आले .

जि प.केंद्रिय प्राथमिक नूतन शाळा भोकर , जिपहा किनी , केंद्रिय शाळा भोसी , प्रा .शा धावरी बु . आदी शाळेचा समावेश आहे .

या बरोबर तालुक्यात विविध उपक्रमात विशेष कार्य केलेल्या उपक्रमशील शिक्षकांचा व विविध क्षेत्रात विविध उपक्रमातून आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविणाऱ्या विद्यार्थ्यांचा वर्षभरापासून विशेष कार्यक्रमात गौरव केल्या जातो .
त्यामध्ये विज्ञान प्रदर्शनातील यशवंत , विविध क्रीडा स्पर्धेतील यशस्वी, सांस्कृतीक कार्यातील गुणवंत , ईत्यादी .
त्याच बरोबर उपक्रमशिल शिक्षक , कला साहित्य व क्रिडा विभागात उत्कृष्ठ कार्य करणारे शिक्षक , राष्ट्रीय व राज्यस्तरीय  उपक्रमात सहभागी शिक्षक , ऑनलाईन कार्यात विशेष कार्य करणारे शिक्षक,राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक ईत्यादी शिक्षकांचाही शिक्षण विभाग पंचायत समिती भोकर द्वारे यथोचित सन्मान केला जातो .