शैक्षणिक वर्ष 2023 - 24 मध्ये राज्यस्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत आयोजित करण्यात आली होती.
माननीय संचालक एस सी आर टी यांच्या 20 जुलै 2023 च्या पत्रानुसार शैक्षणिक वर्ष 2023 -24 मध्ये शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ स्पर्धा राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या ,सर्व माध्यमाच्या ,शिक्षक 'मुख्याध्यापक शिक्षक , प्रशिक्षक यांच्यासाठी ऑनलाईन आवेदन पत्र मागवून घेण्यात आली होती . एकूण तीन स्तरावर व सहा गटात आणि 28 विषयांतर्गत ही स्पर्धा आयोजित केली होती . त्यासाठी तालुका जिल्हा व राज्यस्तरावर विविध प्रकारच्या बक्षिसाची रक्कम ठेवण्यात आली होती .त्यानुसार शिक्षकांनी स्वतः केलेला व्हिडिओ ,ॲनिमेटेड सॉफ्टवेअरचा वापर करून ' स्क्रीन रेकॉर्डर चा वापर करून ' ईमरसिव्ह कंटेंट असलेल्या किंवा खेळावर आधारित ' दिव्यांगाच्या अध्यापनासाठी, राज्य किंवा राष्ट्रीय शिष्यवृत्तीवर आधारित व्हिडिओ मागविण्यात आले होते ,त्यामध्ये स्पष्ट पणा ' गरजाधिष्टीत 'परिणाम ,नाविन्यता समन्वय उपयोगिता ,चित्रफित दर्जा ,अशा निकषाचा, पाच ते नऊ मिनिटापर्यंत असलेला , mp4 स्वरूपातील कॉपीराईट फ्री असलेले व्हिडिओ मागविण्यात आले होते . त्यामध्ये भोकर तालुक्यातील अनेक शिक्षकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी घेऊन तालुका जिल्हा पातळीवर विविध प्रकारचे प्राविण्य मिळवलेले आहे .
सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण 29 एप्रिल 2025 रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था श्रीनगर नांदेड येथे आयोजित करण्यात आले होते . सदर स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री सुदर्शन चिटकुलवार ,शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती सविता बिरगे मॅडम ,माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री माधव सलगर साहेब ,शिक्षणाधिकारी योजना श्री.दिलीप कुमार बनसोडे साहेब , व्हिडिओ निर्मिती स्पर्धा विभाग प्रमुख (अधिव्याख्याता ) श्री प्रकाश शिरसे सर ,तसेच अधिव्याख्याता श्री साखरे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा व तालुकास्तरीय बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला .
यात भोकर तालुक्यातून श्रीमती वैशाली गवळी ,श्रीमती रेखा कंगठीकर ,श्रीमती वर्षा मुडपे, श्रीमती शोभा हंचनाळे , श्रीमती मनोरमा गोवंदे, श्रीमती नंदा सुळकेकर ,श्रीमती सीमा मोघे, श्रीमती संगीता जोंधळे, श्री मिलिंद जाधव , श्री मोहन गुरमे , श्री नरसिंग पसनूरवार या सर्व शिक्षकांनी विशेष कामगिरी करत तालुका व जिल्हा स्तरीय एकूण 15 गटांमध्ये उत्कृष्ट सादरीकरण करून रोख बक्षीस , प्रमाणपत्र व ट्रॉफी प्राप्त केले आहेत . यामध्ये महिला शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सर्वाधिक बक्षीसे पटकावलेली आहेत . भोकर तालुक्याला मिळालेल्या या यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री सुधीर गुट्टे साहेब ,शिक्षण विस्तार अधिकारी श्री वी. रा. शिंदे साहेब ,शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सुमन गोणारकर मॅडम यांनी शिक्षकांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .
एनसीईआरटी व सीआई ई टी दिल्ली द्वारे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ई कन्टेन्ट निर्मितीत भोकरच्या जिल्हा परिषद कन्या शाळेच्या ई कन्टेन्टला मागील वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता .
तसेच भारत सरकारच्या पी एम ईविद्या चॅनेल साठी भोकरच्या शिक्षकांनी इयत्ता 5वी व 8वी वर्गासाठी ई कन्टेन्ट निर्मिती केली . दीक्षा वरिल ऑनलाईन व ब्लेंडेड मोड कोर्स साठीही भोकरच्या तंत्रस्नेही शिक्षकांचे अनेक व्हिडीओ आहेत .
शब्दांकन
श्रीमती - मनोरमा गोवंदे
( जि. प. प्रा. शा. नवी आबादी भोकर )

