भोकरच्या जि प .कन्या शाळेत अवकाश निरीक्षणाचा अनोखा उपक्रम

डायट नांदेडचे प्राचार्य सुदर्शन चिटकुलवार व भोकरचे गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे यांच्या मार्गदशना खाली  शालेय ॲस्ट्रॉनॉमी क्लब भोकर मार्फत जिल्हा परिषद कन्या शाळेत* दिनांक १० मार्च रोजी अवकाश निरीक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .

या कार्यशाळेत कन्या शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक श्री मिलिंद जाधव यांनी विद्यार्थ्यांना डायट नांदेड येथून उपलब्ध केलेल्या  उत्तम दर्जाच्या दुर्बिणीच्या मदतीने विद्यार्थ्यांना चंद्र निरीक्षणाची संधी दिली . या दुर्बिणीद्वारे चंद्रावरील विवर (खड्डे) त्याची किनार आणि तेजस्वी पृष्ठभाग विद्यार्थ्यांना अगदी जवळून पाहिल्याचा अनुभव आला.  

कार्यशाळेत प्रथम दुर्बिणीची ओळख करून दिली . तिचे प्रकार, भाग, कार्य आणि वापर याविषयी विद्यार्थ्यांना समजावले गेले. मोबाईल ॲप्सच्या साहाय्याने सूर्यमालेतील ग्रहांचे स्थान कसे शोधावे? याची माहितीही यावेळी देण्यात आली.  या कार्यशाळेत उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि काही पालक यांनी सहभाग घेतला. 
शाळेचे मुख्याध्यापक श्री विष्णुकांत लांडगे व सर्व सहकारी यांनी यासाठी सहकार्य केले .
विद्यार्थ्यांना भूगोल व खगोलशास्त्रात रूची वाढविण्यासाठी  घेतलेल्या या विशेष उपक्रमाच्यापश्चात  राज्याचे पूर्वशिक्षणसंचालक डॉ .गोविंद नांदेडे साहेब , भंडाऱ्याचे शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के साहेब , नांदेडच्या शिक्षणाधिकारी डॉ सविता बिरगे मॅडम आदी मान्यवरांनी या विशेष उपक्रमा बद्धल अभिनंदन केले आहे .