
भोकर तालुक्यातील 125 शाळांपैकी 41 शाळांमध्ये थकबाकी जास्त असल्याने विद्युत मीटर काढून घेण्यात आलेले होते. या शाळांचे मीटर permanently disconnected केले होते. माननीय उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी सर व माननीय गटविकास अधिकारी माधव केंद्रे सर यांच्या मदतीने 28 शाळांची थकबाकी भरण्यात आली . या सर्व 28 शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन मुख्याध्यापकांना टीआर रिपोर्ट व प्रोसेसिंग फी कॅम्प स्वरूपात भरून MSEB विभागाकडे गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत पाठपुरावा करून कोटेशन काढण्यात आले व सदरील कोटेशन मुख्याध्यापकांनी शाळा संयुक्त अनुदानातून भरले.
गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी पाठपुरावा करून सदरील 28 शाळांमध्ये MSRB मार्फत वीज मीटर बसवले आहे . सर्व मीटर हे पब्लिक सर्विस मीटर सुद्धा करून देण्यात आलेल्या आहेत . त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळातील वीज मीटर हे पब्लिक सर्विस करून घेतलेले आहेत .

