घर घर संविधान

संविधान आपुला
सर्वश्रेष्ट ग्रंथ
प्रगतीचा पथ
दाविणारा ॥

संविधान मूल्ये
मनोमनी पेरू 
एकजीव करू
भारताला ॥

संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून "घर घर संविधान" कार्यक्रम, साजरा  करणेबाबत.

संदर्भ :
१. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांकः बीसीएच-२०.क्र.प्र/२४२५९२-शिक्षण/ मंत्रालय विस्तार, मुंबई दिनांक: १०/१०/२०२४

२. उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचे पत्र संकीर्ण २०२४/प्र.क्र.३३४/एसडी-४ दि.२२/११/२०२४

३. शालेय शिक्षा व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र दि.२१/११/२०२४
4. मा संचालक महोदय ( SCERT पुणे यांचे पत्र दि . २२ / ११ / २०२४


दि.२१/११/२०२४

दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत करुन दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असुन भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते.
भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच संविधानाची मुल्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहचावीत यासाठी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले,शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/स्वयं अर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय संविधानास ७५ वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त सन २०२४-२५ या अमृतमहोत्सवी वर्षात संविधान अमृत महोत्सव "घर घर संविधान" साजरा करणे संदर्भात कळविले आहे.
तदनुषंगाने शालेय स्तरावर खालील उपक्रमांचे आयोजन दि.२६ नोव्हेंबर, २०२४ ते दि.२६ जानेवारी, २०२५ या कालावधीत करण्याचे निर्देश आहेत .
त्यानुसार
शाळा व महाविद्यालय स्तरावर संविधानाची उद्देशिका कायमस्वरूपी लावणे .
परिपाठात प्रास्ताविकेचे वाचन नियमित करणे .
शालेय ग्रंथालयात वाचण्यासाठी  संविधानाच्या किमान 5 प्रती ठेवणे .
भारतीय संविधान विषयावर शिक्षकांचे व्याख्याने ठेवणे .
संविधान मूल्ये यावर आधारीत पथनाट्ये, चित्रकला ,'पोस्टर , फलक लेखन प्रदर्शन आयोजित करणे . निबंध ,भाषण, चित्रकला ,वादविवाद स्पर्धा तसेच सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करणे अपेक्षित आहे .

संदर्भ क्र.३ नुसार, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांच्याकडून २६ नोव्हेंबर, संविधान दिनी एक मॉड्यूल DIKSHA प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात येणार आहे. दि. २६.११.२०२४ रोजी संविधान दिन साजरा करण्यासाठीं आणि त्यानंतरच्या उपक्रमांसाठी हे मॉड्यूल संदर्भ म्हणून वापरण्यात यावे. तसेच PM-eVidya प्लॅटफॉर्मवर संविधान दिनानिमित्त एक व्हिडिओ देखील अपलोड केला जाईल, तो व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवण्यात यावा. त्याचप्रमाणे MyGov पोर्टलवर प्रश्नमंजुषा अपलोड केली जाईल. सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी MyGov पोर्टलवर लॉग इन करून सदर प्रश्नमंजुषा सोडवावी. तसेच सर्व शाळांनी आयोजित केलेले विविध उपक्रमांचे फोटो, व्हिडिओ काढून (Geo Tagging Camera चा वापर करून) MyGov पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश आहेत .

भोकर पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत वरील निर्देशानुसार शाळा व तालुका स्तरावर विविध उपक्रम घेण्यात आले आहेत व शाळा स्तरावर घेत आहोत .
त्यामध्ये  पोस्टर, फलक प्रदर्शन , पथनाट्य , विद्यार्थ्याच्या वेषभुषा स्पर्धा , चित्रकला स्पर्धा , रांगोळी स्पर्धा , निबंध लेखन , शिक्षकांचे  ऑन लाईन वेबिनार , प्रास्ताविकेचे घर घर वाचन कार्यक्रम तसेच तालुका स्तरावर संविधान विषयक छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करून त्याचा लाभ विद्यार्थी, पालक शिक्षकांपर्यंत देण्यात आला आहे .

( उपक्रम चालू आहे . . . . . .)

    उपक्रम प्रमुख
( गटसाधन केंद्र भोकर)